Donation
Recent Events

हवामान पूरक, सकस आणि रोगप्रतिकारक शक्ति वाढविणारा आहार अभियान

Published on August 17, 2022 under Uncategorized
हवामान पूरक, सकस आणि रोगप्रतिकारक शक्ति वाढविणारा आहार अभियान
आद्य खाद्य महोत्सव
सुदर्शन सेवा संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, शिवडी आणि सृष्टीज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “आद्य खाद्य महोत्सव” दि. 16 एप्रिल 2022 रोजी परिवार साफल्य सह. गृह निर्माण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या महिलांनी ज्वारी-बाजरी-नाचणी-वरी यासारखी विविध आदिम धान्ये, मूग-उडीद-कुळीथ यासारखी भारतीय उपखंडात गेली पाच हजार वर्षे पिकवल्या आणि खाल्ल्या जाणाऱ्या कडधान्यांपासून विविध पारंपरिक खाद्य पदार्थ तयार केले होते. मिश्र डाळींचे पायस, मिश्र आदिम धान्यांची भाजणी वापरुन केलेली थलिपीठे, कोथिंबीर वडी, दही वडे, आंबिल, शेंगुळे, मिश्र कडधान्यांची भेळ, हळीवाचे लाडू, नाचणीचे लाडू, वरीचे डोसे, कैरीचे पन्हे, नाचणीची पेज, ज्वारीच्या उकडीचे मोदक यासारख्या विविध पाककृती सादर केल्या.
सृष्टीज्ञान संस्थेच्या सह संचालिका श्रीम. ज्योती खोपकर यांनी परीक्षण केले आणि सर्वोत्तम चार पाककृती निवडण्यात आल्या. या महोत्सवाच्या निमित्ताने हवामान पूरक सकस आहाराबाबत या भागातील लोकांशी संवाद साधता आला याबद्दल श्रीम. ज्योती खोपकर यांनी आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये सुदर्शन सेवा संघाच्या आजी आणि माजी सभासदांनी विशेष परिश्रम घेतले आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम घडवून आणला याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
May be an image of 1 person and foodMay be an image of 6 people
May be an image of 1 person, standing and foodMay be an image of 3 people and outdoors
May be an image of 13 people, people standing and text that says 'पुदशन सेवा सघ (रजि.) (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ) आपले सहर्ष स्वागत करीत आहे.'