Donation
Recent Events

५ जून २०२२! जागतिक पर्यावरण दिन

Published on August 17, 2022 under Uncategorized
५ जून २०२२! जागतिक पर्यावरण दिन
संपूर्ण पृथ्वीला ग्रासलेल्या हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास आणि प्रदूषण या तिहेरी संकटाचा सामना करायचा असेल, तर जास्तीत जास्त वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय आहे. आणि ही लागवड करताना स्थानिक झाडे लावणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटल्याप्रमाणे पृथ्वी हा एक पर्यावरण विषयक जागरूक ग्रह म्हणून तयार करणे हे उद्दिष्टय सगळ्या जगासमोर आहे. हे लक्षात घेऊन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्री इकोलॉजिकल कॉम्प्लेक्स (आंगवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे वृक्षारोपण करण्यात आले. गेली चार वर्षे सृष्टीज्ञान संस्था आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आंगवली पंचक्रोशीत पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेती समृद्धीसाठी काम सुरु आहे. आज पर्यावरण दिनानिमित्त, या कार्यातील पुढील टप्पा म्हणून सेंद्रिय परसबाग लागवड प्रशिक्षण प्लॉटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परस बागेचा अविभाज्य घटक असलेले शेवगा, पपई, लिंबू यासारख्या स्थानिक फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी निसर्ग रक्षक पुरस्कार प्राप्त श्री. प्रतिक मोरे आणि मातृ मंदिर संस्थेचे सी ई ओ श्री. सतिश शिर्के यांची विशेष उपस्थिती होती. येत्या तीन महिन्यात आंगवली गावात प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांसाठी सदर प्लॉट उपलब्ध होणार आहे. सेंद्रिय परसबाग लागवड प्रशिक्षण प्रकल्पा अंतर्गत शेतकरी बंधु – भगिनींना विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने फळभाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे.
सृष्टीज्ञान संस्थेचे सेंद्रिय शेती आणि परसबाग प्रशिक्षणाचे उपक्रम हे ग्लोकल म्हणजेच ग्लोबल समस्यांना दिलेले लोकल उत्तर आहे.
It’s time for bold choices. It’s time for urgent action. It’s time for a better future on a healthy planet.
May be an image of 4 people, people standing, outdoors and treeMay be an image of 2 people and outdoorsMay be an image of 3 people, people standing and outdoors